आमदार नीलेश लंके यांना लाईफ स्फूर्ती पुरस्कार; शनिवारी पुण्यात पुरस्कार वितरण

1 min read

पुणे दि.२७:- पुण्याच्या लाईक माईंडेड इनिशिएटिव्ह फॉर एम्पॉवरमेन्ट लाईफ या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा लाईफ स्फूर्ती सन्मान पुरस्कार आमदार नीलेश लंके यांना जाहिर झाला असून शनिवार दि.३० सप्टेंबर रोजी पुण्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. राजकीय क्षेत्रातून आ. लंके यांची या पुरस्कारासाठी निवड झाली असून प्रशासन सेवेसाठी पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गुट्टे, उद्योग क्षेत्रासाठी भारत पेट्रोलियमचे मुख्य व्यवस्थापक संतोष सोनटक्के, विधी क्षेत्रात अ‍ॅड. मिलींद पवार तर सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. याच कार्यक्रमात खेड पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे, पी.एच.एन.टेक्नॉलॉजीचे संचालक प्रदीप नारायणकर, केक स्टोरीचे मयुर चौखंडे, स्टुडंट हेल्पिंग हॅड्सचे कुलदीप आंबेकर, पोलीस उपनिरीक्षक पुजा राऊत, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल बनसोडे यांना विशेष युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे यंदाचे हे पाचवे वर्ष असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प सुदामराव गोरखे गुरूजी, आमदार संग्राम थोपटे, माजी महापौर मुरलीधर मोहळ हे या सोहळयास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शनिवार दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता आयएमए डॉ. नितू मांडके सभागृह, हिराबागेजवळ पुणे येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार असल्याचे लाईफचे अध्यक्ष ओंकार कोढाळकर, विधिज्ञ अ‍ॅड. भूषण राऊत, उपाध्यक्ष आदित्य जोशी, सचिव प्रज्वल कोंढारे, खजिनदार प्रद्युम्न किराड यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे