श्री गणेशा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वडगाव कांदळी चा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न

1 min read

वडगाव कांदळी दि.२७ :- श्री गणेशा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वडगाव कांदळी (ता.जुन्नर) या पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ बुधवार आज दिनांक २७ रोजी ह.भ.प तुळशीराम महाराज सरकटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला आहे.या वेळी अर्थसंपदा पतसंस्थेचे चेअरमन रमेश म्हेत्रे, जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पांडुरंग पवार, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष महादेव वाघ, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, हरिभक्त परायण तुळशीराम महाराज सरकटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निवृत्ती काळे, नबाजी घाडगे, वडगाव कांदळीच्या सरपंच उल्का पाचपुते. मोहन बांगर, संजय खेडकर, साई लक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन प्रा. श्रीकांत पाचपुते, माजी सरपंच रामदास पवार, नितीन पवार, संजय मुटके, तुषार पाचपुते, मुरली गुंजाळ, बाळासाहेब पाचपुते, बबन पाचपुते, धोंडीभाऊ मुटके, संगीता वाघ, मंगेश काकडे, तानाजी बढे , विश्वास बढे, जयवंत घोडके, मोहन बांगर, वैभव काळे, गुलाब नेहरकर, सचिन शेलोत, संदीप लेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी अनेक मान्यवरांनी नवीन पतसंस्था शुभेच्छा दिल्या. संस्थेचे चेअरमन सुनील देवराम पवार, व्हाईस चेअरमन रवींद्र बाबाजी वामन, सचिव वर्षा नितीन पिंगळे, संचालक अविनाश पवार, इंद्रभान गायकवाड, विनोद निलख, सोमनाथ रेपाळे, महेंद्र सोनवणे, संचालिका शोभा पाचपुते, वैशाली शिंदे, जयश्री थोरात असून सर्वांनी उपस्थितांचे आभार मानले.या नवीन संस्थेने सभासदांसाठी आकर्षक सुविधा दिल्या आहेत. यामध्ये आरटीजीएस,NEFT, IMPS, फंड ट्रान्सफर, एसएमएस सुविधा, आवर्तक ठेव खाते, बचत खाते, मासिक व्याज प्राप्ती खाते, मुदत ठेव खाते, SMS सुविधा तसेच ठेवीवर आकर्षक व्याजदर सुद्धा असणार आहे. जामीन की कर्ज, तारणी कर्ज, बचत गट कर्ज ,वाहन तारणी कर्ज, सोनेतारण कर्ज, ठेव तारण कर्ज अशा विविध मार्गांनी ग्राहकांना कर्ज मिळणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे