संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील गावं नॉट रीचेबल
1 min readसंगमनेर दि.२५ :- तालुक्यातील ग्रामीण भागातील कुंभारवाडी (वरवंडी), खरशिंदे, नांदूर खंदरमाळ या तीनही गावांमध्ये मोबाईल ला रेंज नसल्याने ही गावं नॉट रीचेबल झाली आहेत.यामुळे गावातील ग्रामस्थ व शाळकरी मुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शालेय मुलांना ऑनलाईन क्लास तसेच इतर इंटरनेट सेवा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होत आहे. संबंधित गावात सरकारी कार्यालयात इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने रेशनकार्ड, वैद्यकीय, शासकीय योजना, शैक्षणिक योजना तसेच शेतकऱ्यांच्या विविध लाभाच्या योजनेसाठी इंटरनेट सुविधा उपलब्ध असल्यास ग्रामस्थांचे काम सुलभ होईल. या संपुर्ण तीनही गाव व परिसरात मोबाईल नेटवर्क संदर्भातील अडचणींची दखल आपल्या पातळीवर घेण्यात येऊन आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात येऊन. मोबाईल नेटवर्क उपलब्ध व्हावे अशी संपूर्ण परिसरातील नागरीक व शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने अश्विनी वैष्णव (केंद्रीय दूरसंचार मंत्री, भारत सरकार) यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. अशी माहिती शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक/प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल ढेंबरे पाटील यांनी दिली.