पुणे कार्यकारी अभियंता आर. वाय पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार; पांडुरंग पवार यांनी दिल्या शुभेच्छा
1 min readपुणे दि.२०:- सार्वजनिक बांधकाम विभागाचे उत्तर पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. वाय पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार मिळाला असून त्यांच्या वितरण समारंभ सोहळा नुकताच संपन्न झाला आहे. कार्यकारी अभियंता आर.वाय. पाटील यांनी आंबेगाव व शिरूर येथे उपअभियंता या पदावरती अनेक वर्ष काम केले असून एक कार्यक्षम व हुशार अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. आंबेगाव तालुक्यातील अभियांत्रिकी महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय, आदिवासी आश्रम शाळा, आयटीआय प्रशासकीय इमारत आदी वास्तू निर्मितीमध्ये त्यांचे मुलाचे योगदान आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी त्यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. यावेळी रानमळा गाव चे सुरेश तिकोने,दत्ता लामखडे आदी मान्यवर उपस्थित होते.