जिजाऊ सखी मंचच्या महिलांनी राबवले स्वच्छता अभियान..’गणपती माझ्या दारी…स्वच्छता हवी घरी दरी’…
1 min readआळेफाटा दि.२०:- आळेफाटा (ता.जुन्नर) येथील जिजाऊ सखी मंच गणेशोत्सव मंडळ,अनंतराव कणसे होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय, आळे ग्रामपंचायतीचे सफाई कामगार यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१८ सप्टेंबर रोजी आळेफाटा येथील बसस्थानक तसेच परिसरातील रस्त्यांच्या कडेला असलेल्या कचरा उचलण्यात आला. याप्रसंगी वैशाली देवकर,दिपाली गडगे, मनिषा सोनवणे, मंगल वाणी, लता वाव्हळ, वृषाली नरवडे,अनुराधा सुपेकर, पुनम हाडवळे, मंगल तितर, वैशाली जाधव, अपेक्षा कु-हाडे, वर्षा गुंजाळ, हेमा शिंदे, हेमा बांगर, निशा शेट्टी, सुदंर कु-हाडे आदी महिला उपस्थित होत्या.
दरम्यान या महिलांनी आळेफाटा बस स्थानकात दोन ट्रॉली कचरा साचला होता तो भरून त्याची विल्हेवाट लावली आहे.तसेच यापुढे या ठिकाणी तसेच रस्त्यांच्या कडेला जो कोणी कचरा टाकेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिजाऊ सखी मंच वतीने देण्यात आली आहे. येणार गणपती माझ्या दारी… स्वच्छता हवी घरी दरी… अशी घोषणा देत संपुर्ण परिसरात स्वच्छता करण्यात आली. जिजाऊ मंचच्या स्वच्छता मोहिमीचे आळेफाटामधील नागरिकांकडून कौतुक होत आहे.