दुष्काळग्रस्त आणे पठारासाठी जुन्नर तालुक्यातील पतसंस्थांचा मदतीचा हात
1 min readनारायणगाव दि.१५:- जुन्नर तालुक्याच्या आणे पठारावर दुष्काळी परस्थितीमुळे जनावरांना चारा नसल्याने तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी तालुक्यातील सर्व पतसंस्थांना पठारावरील दुष्काळ निवारणावर मात करण्यासाठी जनावरांच्या चाऱ्यासाठी मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार आज शुक्रवार दि.१५ सर्व पतसंस्थांच्या प्रतिनिधींच्या मिटिंग नारायणगाव या ठिकाणी आयोजित केली.
आणे,नळवणे, शिंदेवाडी, पेमदरा तसेच वाड्या-वस्त्या वरील नऊ हजारापेक्षा अधिक असलेल्या जनावरांसाठी चाऱ्याच्या बाबत निर्माण होणारे संकट व त्यावर मात करण्याच्या दृष्टीने सहकारात अग्रेसर असलेल्या जुन्नर तालुक्यातील पतसंस्थांनी मदत करण्याचे आवाहन जुन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे चेअरमन अमित बेनके यांनी सर्व पतसंस्थांना केले.
यावेळी अनेक पतसंस्थांनी आपल्या परीने मदत देण्याचं आश्वासन दिले असून श्री राम पतसंस्था नारायणगाव यांनी ५१ हजार रुपयांचा चारा देण्याचे चेअरमन तान्हाजी डेरे यांनी जाहीर केले. या प्रसंगी सचिन सरसमकर (सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जुन्नर), त्याचबरोबर तानाजी डेरे (चेअरमन श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था नारायणगाव),
भास्कर बांगर (चेअरमन आदर्श पतसंस्था),तालुक्यात पतसंस्थांचे संचालक,पदाधीकारी उपस्थित होते. तसेच आळेफाटा व पठार भागावरून सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते, शिंदेवाडीचे माजी सरपंच रोहिदास शिंदे, जयसिंग औटी आदी मान्यवर उपस्थित होते.
जनावरांना वाचवण्यासाठी दररोज हजारो टन चारा आणे पठारावरील जनतेला लागत आहे. शासकीय चारा डेपो सुरू न झाल्यामुळे जशी मदत मिळेल तसं या जनावरांना चारा उपलब्ध होत आहे.