पारनेर तालुक्यात विविध विकास कामांसाठी ९० लाखांचा निधी मंजूर;- आमदार नीलेश लंके
1 min read
पारनेर दि.१५:-नागरी सुविधा योजना तसेच जनसुविधा योजनेअंतर्गत विविध विकास कामांसाठी ९० लाख रूपयांचा निधी मंजुर झाल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिले. दरम्यान पारनेर येथील ग्रामीण रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करून त्याचे जिल्हा रूग्णालयात रूपांतर करणे तसेच ढवळपुरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही लंके यांनी सांगितले. लंके म्हणाले, निघोजमधील पांढरकवाडी येथे स्मशानभूमीसाठी १० लाख, पाडळीरांजणगांव येथील स्मशानभूमीसाठी १० लाख, सांगवी सुर्या येथील स्मशानभूमीसाठी १० लाख वडझिरे येथील स्मशानभूमीसाठी १० लाख तर जखणगांव ता. नगर येथील स्मशानभूमीसाठी १० लाख असा ५० लाख रूपयांचा निधी जनसुविधा योजनेअंगर्तत मंजूर करण्यात आला आहे.
नागरी सुविधा योजनेअंतर्गत निघोज येथील नागरी सुविधा योजनेअंतर्गत हवालदार वस्ती ते गवराम ढवळे यांच्या घरापर्यंत रस्त्याची सुधारणा करण्यासाठी १० लाख, राळेगण थेरपाळ येथे गावांतर्गत विद्युतीकरण करण्यासाठी १० लाख, जवळे येथे ठाकर वस्ती रस्ता काँक्रीटीकरणासाठी १० लाख तर ढवळपुरी येथे गावांतर्गत विद्युतीकरणासाठी १० लाख रूपये मंजूर करण्यात आल्याचे आ. लंके यांनी सांगितले.
या कामांसाठी निधी मंजुर करण्यासंदर्भात आ. लंके यांनी दि. ७ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना पत्र दिले होते. त्यांच्या पत्राची दखल घेण्यात येउन या कामांना निधी मंजूर करण्यात आला.आरोग्य विभागाची ऑनलाईन बैठक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आरोग्य विभागाच्या बैठकीस आ. नीलेश लंके यांनी ऑनलाईन हजेरी लाऊन.
पारनेर येथील ग्रामीण रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर तसेच नविन प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीसंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहीती दिली. दोन्ही कामांबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश पवार यांनी या बैठकीत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.