‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबवावा ‘:- पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे

1 min read

आळेफाटा दि.१४:- गणेश उत्सवाची लगबग सुरू असून प्रत्येक गावातील गणेश मंडळांनी ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबवावा,” असे आवाहन आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी मंडळांच्या बैठकीत केले.आळेफाटा (ता. जुन्नर) येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावांमधील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी, पोलिस पाटील तसेच ग्रामस्थांची बैठक उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सौभद्र मंगल कार्यालयात घेण्यात आली. त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.शक्यतो सर्व मंडळांनी सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनच गणपती जवळ सीसीटिव्ही कॅमेरा लावावेत. तसेच चोवीस तास स्वयंसेवक उपस्थित राहतील, याची काळजी घ्यावी, सर्व गणेश मंडळांनी स्थापना मिरवणूक व विसर्जनाच्या वेळी पारंपारिक वाद्यांचा वापर करणे बंधन कारक आहे. सर्वांनी गणेश मूर्तीची उंची मर्यादित ठेवावी, तसेच गणेश उत्सवाच्या काळात कुठल्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये. यासाठी सर्वांनी काळजी घेऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे सांगितले.नलावडे म्हणाले,”सर्व गणेश मंडळांनी ऑनलाइन परवानगी घेणे बंधनकारक आहे. सध्या दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यामुळे सर्वांनी त्या पद्धतीने नियोजन करून शांततेत गणेश उत्सव पार पाडावा.’

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे