मर्यादित वेळेत ध्येय पूर्तीसाठी योग्य नियोजन आवश्यक:संदिप गांधी

1 min read

बेल्हे दि.१२:- समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, बेल्हे (ता.जुन्नर) या महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता.रोटरी क्लब नारायणगाव चे अध्यक्ष संदीप गांधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.मान्यवरांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने करण्यात आली.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संदिप गांधी म्हणाले कि,आपल्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला आपले गुण व क्षमता त्याचबरोबर आपल्यातील कमतरता ओळखता आल्या पाहिजे आणि त्यांना बळकट करून आपण नक्कीच यशाचे शिखर गाठू शकतो.आपण ध्येय निश्चित केल्यानंतर त्या ध्येयाला वेळेची मर्यादा असणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे.मर्यादित वेळेत ध्येय पूर्तीसाठी योग्य नियोजन व त्यानुसार आपल्याकडून कृती झाली पाहिजे.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके तसेच समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार.एम. बी. ए.विभागाचे डायरेक्टर डॉ.शिरीष गवळी,बी.बी.ए व बी.कॉम विभागप्रमुख प्रा.गणेश बोरचटे,क्रीडा संचालक हरिश्चंद्र नरसुडे,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गौरी भोर यांनी आभार प्रदर्शन प्रा.गणेश बोरचटे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे