मुस्लिम समाजाच्या आरक्षण व संरक्षणाच्या मागणी साठी एल्गार- हाजी इर्शादभाई

1 min read

राजुरी दि.१२:- महाराष्ट्रातील मुस्लिम समाज हा शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या तसेच सामाजिक व राजकियदृष्ट्या अतिशय मागासलेला आहे. केंद्र सरकार द्वारे स्थापन करण्यात आलेल्या अनेक आयोगाच्या शिफारशीत तसे स्पष्ट मत जाहिर केलेले आहेत. त्याच प्रमाणे न्यायालयाने ही मुस्लिम समाजास आरक्षण देण्यास हरकत नसल्याचे मत नोंदविलेले आहे. महाराष्ट्रात या आधी सदर मागण्यांसाठी मुस्लिम समाजाचे लाखोंच्या संख्येत मोर्चे व आंदोलने होऊन ही सरकार व प्रशासनाने त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले. तसेच महाराष्ट्रात मुस्लिम व अल्पसंख्याक समाजाच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व गोष्टींकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व मराठा आरक्षण आंदोलनास समर्थन देण्यासाठी तसेच मुस्लिम समाजाच्या आरक्षण व संरक्षणाच्या मागणी साठी महाराष्ट्र राज्यात एल्गार पुकारण्यात येऊन लोकशाहीच्या संविधानिक व अहिंसेच्या मार्गाने विविध प्रकारचे आंदोलने – मोर्चे काढण्यात येणार असल्याची माहिती समस्त मुस्लिम जमात महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष / सदर हाजी इर्शादभाई यांनी दिली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जातीयवादी अतिरेकी शक्तींकडून मुस्लिम व अल्पसंख्याक समाजाच्या प्रार्थना स्थळांवर हल्ले, पवित्र कुरान शरीफ जाळण्याचे प्रकार, मॉब लिंचींग चे प्रकार वाढले असून मुस्लिम समाजाच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकार व प्रशासना कडून अ़़शा घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. सुशिक्षित मुस्लिम तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत या सर्व बाबी निषेधार्थ आहेत. राज्यात ठराविक लोकांकडून अल्पसंख्यांक व इतर समाजांना टार्गेट केले जात असून राज्यातील सामाजिक एकोपा व शांती भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकार व प्रशासनाने अशा दहशतवादी – अतिरेकी व जातीयवादी प्रवृत्तींना वेळीच लगाम लाऊन त्यांचेवर कायदेशीर कारवाई करुन गुन्हे दाखल करावेत अशी मागणी ही हाजी इर्शादभाई यांनी केली आहे. सरकारने इतर समाजांच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजातील भूमिहीन – शोषित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असे निकष लावून मराठा समाजास आरक्षण देण्यास काहीही हरकत नाही. मराठा आरक्षणाला कोणत्याही समाजांचा विरोध नसताना राज्य सरकार जाणिवपूर्वक वेळकाढूपणा करून राज्यातील सामाजिक एकोपा धोक्यात आणीत असल्याचा आरोप हाजी इर्शादभाई यांनी केला आहे. राजुरी (ता.जुन्नर) येथे ही सोमवार दि.११ रोजी ही बैठक पार पडली. यावेळी मुस्लिम जमात महाराष्ट्र चे प्रदेश सचिव डॉ. परवेज अशरफी, ऑल इंडिया उलमा बोर्डचॆ अध्यक्ष याकुब शेख, आतार – मनियार युवा मंच प्रदेशाध्यक्ष वसीम मनियार, शिवनेर चालक मालक वाहतूक सेनेचे राजू मोमीन, खालिद कुरेशी, आ ॅल इंडिया मुस्लिम ओबीसी चे सरचिटणीस एजाज चौधरी, तंटामुक्ती चे उपाध्यक्ष इम्रान मनियार , सुफी शरफुद्दीन पटेल, सुफी शब्बीर चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे