आळ्यात मोफत सर्व रोग निदान शिबीर; शिबिराचा लाभ घेण्याचे श्री क्षेत्र रेडा समाधी मंदिर देवस्थान ट्रस्ट चे आवाहन

1 min read

आळे दि.११:- आळे (ता.जुन्नर) येथील श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट (संस्था) रेडा समाधी मंदिर, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सहयाद्री हॉस्पीटल पुणे एल.आय.ओ.,फाऊंडेशन‌,आरोग्य आधार, महा. एफ. पी. ओ. फेडरेशन, सुवर्णयुग युवामंच यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत सर्व रोग निदान शिबिराचे मंगळवार दि.१३ रोजी आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात अस्थिरोग, ह्रदयरोग, स्त्रीरोग, कर्करोग स्री व पुरूष, मोफत सल्ला व मार्गदर्शन‌, दंत चिकित्सा, रक्त, लघवी, मधुमेह, उच्च रक्तदाब व जनरल‌ तपासणी आदी आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडुन छोट्या व मोठया मोफत तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येणार असुन हे शिबीर गावातील अर्थव मंगल कार्यालयात आयोजित केले आहे.

अशी माहिती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष संदीप निमसे, उपाध्यक्ष निलेश पिंगळे सचिव अविनाश कु-हाडे व खजिनदार अमोल भुजबळ व्यवस्थापक कान्हु पाटील कु-हाडे यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे