मातोश्री ग्लोबल स्कूल,कर्जुले हर्या राष्ट्रभाषा हिंदी दिवस बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा

1 min read

कर्जुले हर्या दि.१५:- कर्जुले हर्या (ता.पारनेर) मातोश्री ग्लोबल स्कूल येथे हिंदी दिन दिवस व बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाडू माती पासून तयार केलेले रंगीबेरंगी व सुंदर बैल प्रदर्शित करण्यात आले व त्यांची पोळा सणानिमित्त विधिवत पूजा करण्यात आली. तदनंतर हिंदी दिवसा बद्दल सखोल माहिती हिंदीच्या शिक्षिका संध्या निवडुंगे तसेच गणिताचे शिक्षक फरीद पटेल यांनी दिली. मातोश्री ग्लोबल स्कूल च्या प्राचार्या शितल किरण आहे यांनी आपल्या भाषणात सांगितले की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असून 14 सप्टेंबर या दिवशी भारताच्या संविधान सभेने 1949 मध्ये देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी ही भारतीय प्रजासत्ताकची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारली होती. व तेव्हापासून आपण दरवर्षी 14 सप्टेंबर हिंदी दिवस म्हणून साजरा करीत असतो. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असून हिंदी भाषेतील समृद्ध असे साहित्य असून हिंदी भाषा ही एक सुंदर, सरल, मधुर व सहज भाषा आहे. हिंदीत प्रेमचंद, जय शंकर प्रसाद, रामधारी दिनकर, सूर्यकांत त्रिपाठी निराला, हरिवंश राय बच्चन, मैथिली शरण गुप्त, सुमित्रानंदन पंत गुलजार अमृता प्रीतम, महादेवी वर्मा इत्यादी सारखे अनेक दिग्गज साहित्यिकांनी हिंदी भाषा समृद्ध करून त्यांच्या विविध साहित्यकृतीतून आपली भारतीय संस्कृती. भारतीय समाज, भारतीय जीवन परंपरा व चालीरीती वर सखोल प्रकाश टाकला असून या सर्व लेखकांचे साहित्य अजरामर आहे. असे हिंदीतील साहित्य आपण सातत्याने अभ्यासले पाहिजे व आपले जीवन मूल्य तसेच मानवी मूल्य ही पुढील पिढीसाठी जतन करावित असा संदेशही त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांना दिला. तदनंतर आहेर यांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात राज्यात शेतकरी राजाचा बैलपोळा सण देखील अतिशय महत्त्वाचा असून. या दिवशी भारतीय संस्कृतीनुसार आपल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेती कामात कष्ट करून भरपूर धान्य धनधान्य, फळे, फुले आणि भाजीपाला इत्यादीचे उत्पन्न काढण्यास सहकार्य करणाऱ्या बैल या प्राण्याचे उपकार आपल्यावर आहे त्याची परतफेड म्हणून बैलपोळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.या दिवशी बैलांना अंघोळ घालून सजविले जाते तसेच त्यांची संपूर्ण गावात मिरवणूक काढून घरोघर नैवेद्य दाखविला जातो व पूर्ण दिवस बैलांना विश्रांती देवून त्यांचा आदर केला जातो. ही परंपरा देखील भारतीय संस्कृती मधील आचार विचार व प्राणीमात्रांवर असलेले प्रेम दर्शविते ही परंपरा यापुढेही आपण तशीच चालावायाची आहे असेही शाळेच्या प्राचार्या शीतल आहेर यांनी आपल्या भाषणात सांगितले. शेवटी उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना हिंदी दिवस तसेच बैलपोळ्याच्या मधुर शुभेच्छा त्यांनी दिल्या.तदनंतर शाळेतील विद्यार्थी यशवर्धन, ओवी, दीक्षा, विराज आहेर,यांनी देखील हिंदी दिवस व बैलपोळ्याबद्दल आपल्या भावना त्यांच्या भाषणातून व्यक्त केल्या.सदर कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख राणी रासकर यांनी केले.
सदर कार्यक्रमात मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मिरा आहेर, खजिनदार बाळासाहेब उंडे, विश्वस्त डॉ. दिपक आहेर, विश्वस्त डॉ. श्वेतांबरी आहेर. संस्थेचे सेक्रेटरी किरण आहेर, संस्थेच्या विश्वस्त व मातोश्री ग्लोबल स्कूल च्या प्राचार्या शितल आहेर, कार्यालयीन अधीक्षक यशवंत फापाळे, शाळेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश व्यास, शाळेतील शिक्षक सुनील उंडे, सुनील रोकडे, जाफर शेख, प्रगती आहेर, विशाल डोळस, सायली पिंगट, शुभांगी निमसे, सविता भांड, प्रतिमा पवार,अश्विनी केदार, किर्ती शिंदे तसेच पालक उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे