घरोघरी बाप्पा चे जल्लोषात आगमन

1 min read

आळेफाटा दि.१९ :- बेल्हे (ता.जुन्नर) परीसरातील राजुरी, जाधववाडी, बोरी बुद्रूक, साळवाडी, शिरोली सुलतानपुर, भोरवाडी, कांदळी वडगाव, अणे, नळवणे, शिंदेवाडी, पेमदरा, साकोरी, मंगरूळ, पारगाव, निमगाव व परिसरातील गावातील नागरिकांनी गणपती बाप्पांचे जोरदार स्वागत केले. मंडळाच्या गणपती पेक्षा घरगुती बाप्पाची स्थापना जास्त करण्यात आली. मंडळाच्या गणेशा ऐवजी नागरिक यंदा घरोघरी मूर्तीची स्थापना करत आहेत. दिवसभर मंडळाचे कार्यकर्ते, घरगुती गणपती व गणेश भक्तांची दिवसभर रेलचेल सुरू होती. वाजत गाजत बाप्पाच स्वागत करून, मूर्तीची स्थापना करण्यात आली. मंडळाच्या तसेच घरगुती बाप्पाला आकर्षक सजावट करण्यात येत असून बाप्पाची सजावट पाहण्यासाठी गणेश भक्त गर्दी करत आहेत. दिवसभर परिसरामध्ये ढोल ताशाच्या आवाजाने व ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ गजराने परिसर दणाणून गेला होता.काही मंडळांचा व घरगुती गणेश उत्सव अतीशय साध्या पध्दतीने करण्याचे ठरवले आहे.यंदा पाऊस न झाल्यामुळे गणपती विसर्जन कुठे करावे असा ग्रहण प्रश्न मात्र गणेश भक्तांसमोर उभा राहिला आहे. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात अद्यापही जोरदार पाऊस न झाल्यामुळे कुठेही ओढ्यांना,बंधारे,तलाव,विहीर, नदीला पाणी नाही त्यामुळे विसर्जनाचा प्रश्न सध्या गणेश भक्तांना सतावत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे