श्रीमंत दगडूशेठ हलवाई च्या अयोध्या श्रीराम मंदिराचे उद्घाटन; प्रतिकृती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी 

1 min read

पुणे दि.२०:- श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने ट्रस्टच्या १३१ व्या वर्षी गणेशोत्सवात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या सजावटीचे उद्घाटन औसा संस्थान, नाथ संस्थानचे पीठाधिपती प.पू. गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते झाले.

या वेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हजारो दिव्यांच्या प्रकाशात उजळलेले मंदिर पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली.

मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १२५ फूट लांब, ५० फूट रुंद आणि १०० फूट उंच आहे. प्रतिकृतीमध्ये २४ खांब व २४ कमानी उभारण्यात आल्या आहेत.

मंदिराचा मुख्य घुमट १०० फुटांपेक्षा उंच असून ध्वजासहित सुमारे १०८ फूट उंच मंदिर आहे. याशिवाय मंदिराचे छोटे आणि मोठे असे रेखीव ११ कळस आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे