गुळुंचवाडीत दहीहंडी कार्यक्रम उत्साहात संपन्न

1 min read

गुळुंचवाडीत दि.१०:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळूंचवाडी (ता.जुन्नर) येथे गोपाळकाल्यानिमित्त दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बाळगोपाळांनी आकर्षक पोशाख परिधान केले होते.रांगोळी,विविध फुलांनी व फुग्यांनी दहीहंडी सजवली होती.राधा व कृष्णाची वेशभूषा केलेले विद्यार्थी सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. टिपर्या व दांडीयांच्या तालावर विद्यार्थीनी उत्कृष्ट ताल धरला होता.यावेळी शाळेतील शिक्षिका, व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा, महिला सदस्या व महिला पालक यांनादेखील फुगडी खेळण्याचा मोह आवरता आला नाही.वरुणराजाच्या आगमनाने विद्यार्थी, शिक्षक व पालकही उत्साहित झाले होते. मुले व मुली अशा वेगवेगळ्या गोविंदा पथकाने तीन थर रचून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला शेवटी मुलांच्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली.सर्वांनी एकच जल्लोष केला.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या पथकाचे अभिनंदन करण्यात आले. अशा प्रकारे जि.प,शाळा गुळूंचवाडी येथे दहीहंडी उत्सव शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ,गुळूंचवाडी शाळेतील अशोक बांगर, सरिता मटाले, ज्योती फापाळे, नरजहाँ पटेल व ज्ञानेश्वर जाधव यांच्या अथक परिश्रमाने संपन्न झाला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंगनाथ भांबेरे,उपाध्यक्ष चंचल गुंजाळ, सुषमा भांबेरे,सविता डुकरे, भामाबाई गुंजाळ, सखुबाई भांबेरे,निर्मला गुंजाळ, लक्ष्मणशेठ गुंजाळ, शांताराम खिलारी, नरेश भांबेरे, संतोष गुंजाळ, पोपट काळे,रमेश शिंदे,रामचंद्र जाधव, विठ्ठल काळे, गायके पाहुणे,विजय गुंजाळ, ग्रामस्थ व महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या. अशा प्रकारे गुळुंचवाडी शाळेतील दहीहंडी कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समितीच्या,ग्रामस्थांच्या उपस्थितीत तसेच शाळेतील सर्व शिक्षकांच्या सहकार्याने व सर्व उत्साही विद्यार्थ्यांच्या सहभागाने उत्साहात साजरा झाला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे