विद्यानिकेतन मध्ये रंगल्या मंगळागौर व उखाणा स्पर्धा; निमगाव सावा च्या हिरकणी ग्रुप चा प्रथम क्रमांक
1 min read
साकोरी दि.९:- विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी साकोरी (ता.जुन्नर) आयोजित मंगळागौर व उखाणा स्पर्धा मोठ्या उत्साहाने विद्यानिकेतन संकुलामध्ये पार पडली. ही स्पर्धा महिलांसाठी एक अनोखी स्पर्धा होती. मंगळागौर ची आरती आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमामध्ये आमदार अतुल बेनके यांच्या मातोश्री राजश्री बेनके व योगिता खैरे यांनी पारंपारिक फुगडी खेळली तसेच उखाणेही घेतले. कार्यक्रमांमध्ये महिला पालकांमध्ये दहा ग्रुप सहभागी झाले मध्ये निमगाव सावा हिरकणी ग्रुप जबरदस्त मंगळागौर डान्स करत प्रथम क्रमांक मिळवला. सखी ग्रुप काळवाडी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तसेच वीरांगणा ग्रुप पारगाव यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
तसेच मायलेकी ग्रुप निमगाव सावा यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले, उखाणा स्पर्धेमध्ये देखील १५० महिलांनी सहभाग घेतला मध्ये प्रथम क्रमांक अश्विनी गाडगे, द्वितीय क्रमांक अर्चना वामन, तृतीय क्रमांक छाया घोडे आणि रूपाली व्यवहारे तसेच अपेक्षा टांकसाळे यांनी मिळवला. वरील सर्व ग्रुप ने या दोन्ही स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतला या वेळी पालक प्रतिनिधी म्हणून अपेक्षा टांकसाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाबद्दल मनोगत व्यक्त करताना आमदार अतुल बेनके यांच्या आई राजश्री बेनके म्हणल्या की, अशा पद्धतीचे संस्कृतीची संस्कृतीचे जतन होणे हे शाळेच्या माध्यमातून होणं हे भावी पिढीसाठी अतिशय मौल्यवान आहे. आजच्या या धकाधकीच्या व्यस्त जीवनात महिला आपल्या कुटुंबाच्या काळजी मध्ये गुंतलेल्या असतात त्यांच्यासाठी एक वेगळा स्टेज निर्माण करणारा कार्यक्रम आहे.
या सर्व कार्यक्रमाच आयोजन नियोजन विद्यानिकेतन संकुलाच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या प्राचार्या रुपाली पवार (भालेराव), विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी चे प्राचार्य अमोल जाधव आणि पी.एम हायस्कुल च्या प्राचार्या सुनीता शेगर तसेच सर्व शिक्षकांनी चोख पार पाडले.तसेच मंगळागौर सजावट, बाईपण भारी देवा सेल्फी पॉईंट बनवण्यात आला होता.
या वेळी विद्यानिकेतन संकुलाचे संस्थापक पी .एम. साळवे, पी.डी.सी बँकेच्या मा उपाध्यक्षा राजश्री बोरकर, राजश्री देवदत्त निकम,सरपंच तारा लामखडे, वैजयंती कोरहाळे, योगिनी खैरे, प्रियंका बोरकर, सीमा रघतवान, योगिता खैरे ,सुजाता भोर या मान्यवर तसेच विद्यानिकेतन संकुला मधील सर्व महिला पालक कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा अक्षदा दशरथ मांडे या होत्या. तर सर्व उपस्थितांचे आभार विद्यानिकेतन संकुलाचे संस्थापक पी .एम. साळवे यांनी मानले.