समर्थ गुरुकुल मध्ये दहीहंडी चा उत्सव जल्लोषात

1 min read

बेल्हे दि.८:- समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ गुरुकुल बेल्हे (ता.जुन्नर) या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दहीहंडीचा उत्सव मोठ्या आनंदाने,जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला.इयत्ता नर्सरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी राधा,कृष्णाची व बालगोपाळांची वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या बालचमुनी शाळेत जी दहीहंडी तयार केली त्यामध्ये विविध खाद्यपदार्थ पोहे,दही,दूध,लोणी हे सगळे एकत्र कालवून त्याचा काला तयार केला होता.श्रीकृष्णाने गाई चरताना स्वतःची व सवंगड्यांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला होता व सर्वांसह भक्षण केला होता. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली. दहीहंडी फोडल्यानंतर सर्वांनीच हा काला प्रसाद म्हणून ग्रहण केला.माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके यांनी गोपाळकाल्याचे महत्त्व विशद केले.आजचा दिवस समर्थ गुरुकुल मध्ये अत्यंत आनंदाचा असल्याचे प्राचार्य सतिश कुऱ्हे यांनी सांगितले.यावेळी चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी श्रीकृष्ण व राधा यांच्यावर आधारित संगीत व नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.सदर दहीहंडीचे नियोजन संकुलाचे क्रीडा संचालक हरिश्चंद्र नरसुडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले.या उत्सवाला संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके. माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहल शेळके,संचालिका सारिका शेळके, गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, ज्युनियर कॉलेज च्या प्राचार्या वैशाली आहेर, आयटीआय चे प्राचार्य पांडुरंग हाडवळे, गुरूकुलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र मते यांनी तर आभार किरण वाघ यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे