मातोश्री ग्लोबल स्कूल कर्जुले हर्या येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहिहंडी उत्साहात साजरी
1 min readकर्जुले हर्या दि.८:- मातोश्री ग्लोबल स्कूल येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहिहंडी मोठ्या उत्साहात साजरा झाला. मातोश्री ग्लोबल स्कूलचे इयत्ता नर्सरी ते चौथीचे विद्यार्थी श्रीकृष्ण व राधाचे वेशभूषेत मनोहारी दिसत होते. शाळेतील परिसर राधाकृष्णमय झाला. तदनंतर दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांनी मनोरे रचून पूर्ण केला.
शाळेतील शिक्षिका अनिता औटी औटी यांनी भगवान श्रीकृष्णाच्या बालपणापासून केलेल्या अनेक लीला व मथुरे पासून तर द्वारकेपर्यंत त्यांचे जीवन कसे होते यावर महत्त्वाची माहिती दिली. तर भगवद्गीतेत मनुष्य जीवनातील विविध समस्या व संकटावर धर्म व अधर्म वर त्यांनी केलेला उपदेश व संदेश अनंत काळापर्यंत मानव जातीस कसा उपयुक्त आहे हे देखील समजावून सांगितले.
त्यानंतर सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दही काला चा प्रसाद देण्यात आला. श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडीचा कार्यक्रमाचे आयोजन शिक्षिका अश्विनी केदार यांनी केले होते. या दहीहंडीच्या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक सुनील उंडे, विशाल डोळस, सुनील रोकडे, फरिद पटेल, जाफर शेख, प्रगती आहेर, सायली पिंगट, शुभांगी निमसे, सविता भांड, प्रतिमा पवार,किर्ती शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
मातोश्री ग्लोबल स्कूलच्या प्राचार्या शितल आहेर यांनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमात मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मिराताई आहेर,खजिनदार बाळासाहेब उंडे, विश्वस्त डॉ. दिपक आहेर, विश्वस्त डॉ. श्वेतांबरी आहेर, संस्थेचे सेक्रेटरी डॉ.किरण आहेर, संस्थेच्या विश्वस्त व मातोश्री ग्लोबल स्कूल च्या प्राचार्या शितल आहेर, कार्यालयीन अधीक्षक यशवंत फापाळे, शाळेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश व्यास, शाळेतील शिक्षक तसेच पालक उपस्थित होते.