दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात सयंमाची दहीहंडी 

1 min read

निमगाव सावा दि.७:- येथील श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित, दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालय (ता.जुन्नर) यामध्ये गोपाळकाला अर्थात दहीहंडी उत्सव, राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.

कोणतेही काम करण्यासाठी संघटना हवी असते आणि त्या संघटनेत एकी हवे असते. एका व्यक्तीला यशाच्या शिखरावर पोहोचवायला स्वतःच्या खांद्यावर जबाबदरीच ओझं घेऊन यश मिळेपर्यंत संयम धरायला शिकवते ती दहीहंडी. विद्यार्थ्यांनी संयमाचे थर लाऊन दहीहंडी फोडली.

अशाप्रकारे संस्कृतीचा वारसा जपत महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र येत, भर पावसात मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडून उत्सव साजरा केला.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, सचिव परेश घोडे इत्यादी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. छाया जाधव यांच्या मार्गदर्शनाने, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीन मोजाड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांनी दहीहंडीचा आनंद घेतला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे