निघोटवाडी येथे जन्माष्टमी निमित्त ११७ वा ऐतिहासिक हरिनाम सप्ताह व भजन स्पर्धा

1 min read

मंचर दि ७ :- निघोटवाडी पंचक्रोशीतील भाविक भक्त व पाहुणे मंडळीनी शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी कार्यक्रमास भेट दिली त्यांचे स्वागत शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख प्रा सुरेखा निघोट, शिवसेना ऊपतालुका प्रमुख. सचिन निघोट, सु निघोटवाडी पतसंस्था संचालक नवनाथ निघोट, सोसायटी उपाध्यक्ष बाळासाहेब निघोट, विपुलभाऊ निघोट, वहातुक सेना तालुका प्रमुख संजय चिंचपुरे,भरत निघोट, नितीन चासकर भारतीय विद्यार्थी सेनेचे मा.तालुकाप्रमुख प्रा.अनिल निघोट व ग्रामस्थ निघोटवाडी यांनी केले.

यावेळी११७ वे वर्ष साजरे करणारे निघोटवाडी गाव ची धार्मिक परंपरा संपूर्ण तालुक्यास अभिमानास्पद सांगुन गावच्या एकीबद्दल कौतुक केले.हरिनाम सप्ताह व भजन स्पर्धा मंदिर प्रांगणातील गोकुळ नगरी सभागृहात कार्यक्रम संपन्न झाले हभप माधव महाराज रसाळ यांचे देवजन्माचे व सकाळी १० वाजता काल्याचे किर्तन व त्यानंतर अन्नप्रसादाचा आणि दहिहंडी चा भाविकांनी लाभ घेतला.किर्तनात वादनाची साथ आळंदी येथील सारंग महाराज, रविराज महाराज यांनी तर भजन स्पर्धेत सव्वीस भजन मंडळांपैकी प्रथम क्र.पिरसाहेब भजन मंडळ गवारीमळा, द्वितीय क्र.त्रिमूर्ती भजन मंडळ,त्रुतिय क्र.तांबेश्वर मंडळ तांबे, ता.जुन्नर तर चौथा क्रमांक कमलादेवी मंडळ जाधववाडी यांचा आला. निघोटवाडीतील हरिनाम सप्ताहाची ११७ वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या कार्यक्रमासाठी युवा ब्रिगेड. सर्व मंडळे, सरपंच नवनाथ निघोट,गावकारभारी धनंजय निघोट, सचीनशेठ निघोट, संदीपशेठ निघोट व सामाजिक कार्यकर्ते वत्सलाबाई निघोट, सुष्मिता निघोट,मिनाबाई निघोट,बहिरू निघोट हनुमंत निघोट ,भिवसेन निघोट , अंकुश निघोट, बाबुराव निघोट सनद निघोट खंडु निघोट व ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे