सह्याद्री व्हॅलीत रंगला जन्माष्टमी महोत्सव
1 min read
राजुरी दि.७:- सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूल राजुरी (ता.जुन्नर) येथे जन्माष्टमी उत्सवात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात शाळेचे विद्यार्थी राधा आणि कृष्ण च्या वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून आले होते. शाळेमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडीचा कार्यक्रम आनंदात साजरी करण्यात आला.
जन्माष्टमीच्या कार्यक्रमांमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या कथा, गायन नृत्य असे अनेक कार्यक्रम घेण्यात आले. दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये मुलांच्या बरोबरीने मुलींनीही दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला.या कार्यक्रमांचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला. तसेच शाळेच्या प्राचार्य रिजवाना शेख यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी शाळेच्या शिक्षकांनी मोठी मेहनत घेतली.