बाप्पाच्या आकर्षक व सुबक मूर्ती बनविण्यात मूर्तिकार व्यस्त; यंदा गणेश मूर्ती १५ ते २० टक्याने महाग:- प्रसिद्ध मूर्तिकार श्रीपाद घाटपांडे
1 min readआळे दि.२ :- महागाईचा फटका यंदा गणपती मूर्त्यांना सुद्धा बसण्याचे चिन्ह असून १५ ते २० टक्याने मुर्त्यांच्या किमती वाढणार आहेत. त्यामुळे यंदा मूर्ती खरेदी करताना ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. तसेच कलरची सुद्धा दर वाढल्याने मुर्त्यांचे दर वाढलेले आहेत.
तसेच शाडू मातीच्या व पी.ओ.पी मूर्त्यांना मागणी वाढली असल्याचे आळे येथील श्री मंगलमूर्ती प्रसिद्ध गणपती मूर्ती कारख्याण्याचे मूर्तिकार श्रीपाद घाटपांडे यांनी सांगितले.यंदा गणेशमूर्तीच्या उंचीबाबत मर्यादा नसल्याने मुर्तिकरांमधे आनंदच वातावरण आहे.
मंडळाच्या मुर्त्यांच्या बुकिंग च्या ऑर्डर सुरू झाल्या आहेत. यंदा मोठया उंचीच्या गणपती मूर्ती मिळवण्यास शोधाशोध करावी लागत नाही. तर गणपती उत्सवाला वेळ असल्याने आल्यामुळे मूर्तिकार मुर्त्या बनवण्यात व्यस्त आहेत.
गणेश उत्सवाला थोडेच दिवस राहीले असल्याने आळे, राजुरी, बेल्हे, आळेफाटा येथील बाप्पाच्या मुर्ती बणवण्याचे काम जोरात सुरू आहे. घरगुती तसेच मंडळाच्या मूर्ती बुक करण्याची तयारी भाविक करत आहेत.