आळे येथून आज श्री साईभक्त पालखी शिर्डीला मार्गस्थ

1 min read

आळेफाटा दि.२:- आळे (ता. जुन्नर) येथून आज श्री साईभक्त पालखी शिर्डीला मार्गस्थ झाली. या पालखीमध्ये सुमारे ८५ ते १०० भाविक असून बोटा, साकुर, पानोडी,घोरपडेवस्ती मार्गे ही पालखी रविवार दि.६ रोजी पालखी शिर्डी येथे पोहोचते.

पालखीचे यंदाचे आठवे वर्ष असून दरवर्षीही पालखी मोठ्या उत्साहात गावातून वाजत गाजत जाते.या पालखी सोहळ्यात तरुणाची संख्या अधिक असून तरुण मोठ्या भक्ती भावाने सोहळ्यात सहभागी होतात. मिरवणूकी वेळी अनेक भाविकांनी पालखीचे व बाबांच्या पादुकांचे दर्शन घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे