मातोश्री ग्लोबल स्कूल,कर्जुले हर्या येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा

1 min read

कर्जुले हर्या दि.५:- मातोश्री ग्लोबल स्कूल येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मातोश्री ग्लोबल स्कूलच्या प्राचार्या व प्रशासकीय अधिकारी प्रकाश व्यास व शिक्षक वृंद यांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यात आला व कार्यक्रमाची सुरुवात झाली.

शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षकांनी त्यांच्या शिक्षकांच्या भूमिका पार पाडत शाळेचे आजचे दैनंदिन कामकाज पूर्ण केले. शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी दीक्षा डुकरे, कल्पिता छाजेड, ऋत्विका, सृष्टी उंडे, सिद्धार्थ गांधी, ओवी, प्रगती, पायल, सार्थक उंडे विराज आहेर, राधिका, वेदांत निमसे, संचित इत्यादी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची उत्कृष्ट पद्धतीने भूमिका बजावली. अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनियर केजी च्या वर्गात जाऊन लहान विद्यार्थ्यांचा समोर वर्ग घेतले. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिस्त व धावपळ पाहून सर्वांनाच आनंद वाटत होता.

दुपारनंतर सर्व विद्यार्थी जमले आणि शाळेतर्फे शिक्षक दिनाची सांगता म्हणून एक छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी आपापले अनुभव सर्वांसमोर प्रस्तुत केले व शिक्षकांचे संगित खुर्ची, गायन व त्यांच्या आवडीनिवडी विचारून सगळ्यांचेच मनोरंजन केले. तसेच विविध करमणुकीचे व स्पर्धेचे आयोजन ही विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांसाठी केले होते.

विद्यार्थ्यांनी केलेल्या आजच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाबद्दल मातोश्री ग्लोबल स्कूलच्या प्राचार्या शितल आहेर यांनी त्यांचे खूप कौतुक केले व शिक्षकांचे महत्त्व हे विद्यार्थी जीवनात किती महत्त्वाचे असते हे आपल्या भाषणातून स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे शिक्षक जाफर शेख व शिक्षिका राणी रासकर यांनी केले होते.

सदर कार्यक्रमात मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मिरा आहेर, खजिनदार बाळासाहेब उंडे, विश्वस्त डॉ. दिपक आहेर, विश्वस्त डॉ.श्वेतांबरी आहेर, संस्थेचे सेक्रेटरी डॉ.किरण आहेर, संस्थेच्या विश्वस्त व मातोश्री ग्लोबल स्कूल च्या प्राचार्या शितल आहेर, कार्यालयीन अधीक्षक यशवंत फापाळे, शाळेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश व्यास, शाळेतील शिक्षक सुनील उंडे, सुनील रोकडे, फरिद पटेल जाफर शेख, प्रगती आहेर, सायली पिंगट, शुभांगी निमसे, सविता भांड, प्रतिमा पवार,अश्विनी केदार, किर्ती शिंदे तसेच पालक उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे