आमदार निलेश लंके यांनी जालन्याच्या घटनेचा केला तीव्र निषेध; तहसीलदारांना निवेदन

1 min read

पारनेर दि.४:- जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर झालेल्या लाठी चार्जचा निषेध करीत मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे अशी मागणी आमदार नीलेश लंके यांनी केली आहे.

सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या दरम्यान पोलीसांनी आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आमदार लंके यांनी तहसीलदारांना निवेदन देवून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.


आमदार लंके यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले की,जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणास बसलेल्या नागरिकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केल्याने ह्या लाठीचार्ज मध्ये अनेक तरुण, माता भगिनी जखमी झाले आहेत. ही सर्व गोष्ट निंदनीय असून आपण या गोष्टीचा जाहीर निषेध नोंदवत आहे.तसेच सदर घटनेची शासनाने सखोल चौकशी करून दोषी अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी.

तसेच लवकरात लवकर मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण शासनाने दिले पाहिजे. आपण जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून याप्रश्नी निश्चित सरकार दरबारी पाठपुरावा करेलच मराठा समाजाला न्याय मिळावा ही आमची आग्रही भूमिका असून आपण सुद्धा मराठा समाजाच्या तीव्र भावनांचा विचार करून शासन दरबारी आपल्या मार्फत मराठा समाजाच्या भावना कळवाव्यात असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदन देताना व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मारुती रेपाळे,शिक्षक नेते रा.या.औटी, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे, ॲड. राहुल झावरे,भाऊसाहेब भोगाडे, राजेश चेडे, दत्ता दिवटे, दत्ता ठाणगे, बाळा ब्राह्मणे,महेंद्र गायकवाड, वैभव गायकवाड,विजय डोळ, रामिज राजे,अमित जाधव, जितेश सरडे, प्रमोद कळमकर, योगेश मते,सचिन नगरे,तुषार सोनवणे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे