मातोश्री कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला प्रत्यक्ष मतदानाचा हक्क; ‘शिंदे’ सरकारची निवड
1 min read
कर्जुले हर्या दि.१:- कर्जुले हर्या (ता.पारनेर) येथील मातोश्री सायन्स कॉलेज सालाबाद प्रमाणे दरवर्षी विद्यार्थी प्रतिनिधी, सी. आर., एल.आर. त्याचप्रमाणे विविध विभागांचे विभाग प्रमुख अशा निवडणुका घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम करत असते. विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकीत आदेश बाळासाहेब शिंदे व विठ्ठल संतोष शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरले. अत्यंत चूरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये विठ्ठल शिंदे याला विजयी घोषित करण्यात आले. विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच नेतृत्व गुण अवगत व्हावा त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे प्रगती करावी या साठी शैक्षणिक वर्षांमध्ये विविध प्रकारचे उपक्रम साजरे करत असते.
त्यानुसार अकरावी सी.आर. पदी आकांक्षा भाईक ची निवड करण्यात आली व बारावी सी.आर. पदी समृद्धी धुमाळ ची निवड करण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संस्थेचे सचिव किरण आहेर व केंद्रप्रमुख राहुल सासवडे यांनी काम पाहिले.
सदर सर्व पदाधिकाऱ्यांचे व विभाग प्रमुखांचे संस्थेच्या अध्यक्षा मीरा आहेर, कार्याध्यक्ष डॉ. दिपक आहेर, सचिव किरण आहेर, खजिनदार बाळासाहेब उंडे,संचालिका डॉ. श्वेतांबरी आहेर, संचालिका शितल आहेर,संस्थेचे रजिस्टर यशवंत फापाळे, प्राचार्य राहुल सासवडे, गणेश हांडे, राजेंद्र साठे, अजिक्य बिडकर, प्रणया बोरीकर, गणेश कुटे, राजन वर्मा, तिवारी सर यांनी विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन केले.