बांगरवाडीची बेपत्ता दोन्ही मुल शेवगावला सुखरूप; आळेफाटा पोलिसांची उत्तम कामगिरी
1 min readबांगरवाडी (ता.जुन्नर) या ठिकाणाहून दोन अल्पवयीन मुले दोन दिवसांपासुन बेपत्ता झाली होती.सदर मुले ही शेवगाव या ठिकाणी बस स्थानक परिसरात आढळून आली आहेत.
याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशन कडुन मिळालेल्या माहिती नुसार बांगरवाडी (ता.जुन्नर) येथील संदीप हरिभाऊ घंगाळे (वय-४१) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुलगी अनुष्का संदिप घंगाळे (वय १५) व मुलगा स्वराज संदिप घंगाळे (वय ९ वर्ष) हे दोघेजण रविवार दि.२७ रोजी दुपारी १२ दुपारी ३ वाजल्यापासून घरात दिसले नाही त्यांणी अजुबाजुला शेतावर नातेवाईकांकडे तपास केला असता दोन्हीही मुले न मिळाल्याने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन अज्ञात इसमाने फुस लावुन नेले असल्याची माहिती दिली आहे. पोलीसांणी अज्ञात व्यक्ती विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरली सर्व बस स्थानक, टोल नाका,रिक्षा स्टँड, सीसीटीव्ही, मोबाईल ट्रेकिंग या आधारे तपासणी सुरू केली. दोन्ही मुले शेवगाव (जिल्हा अहमदनगर) या ठिकाणी बस स्थानकाजवळ असल्याची माहिती नातेवाईक व पोलिसांनी मिळाली.
त्यानुसार आळेफाटा पोलिसांची टीम व नातेवाईक शेवगाव या ठिकाणी रवाना झाले आहेत.ही मुले तिकडे कशी गेली? कोणी नेली? याचा पुढील तपास आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय.अनिल पवार करत आहे.