आनंदवार्ता! श्री हॉस्पिटल मध्ये वंध्यत्व निदान, IVF, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, तसेच कॅथलॅब, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी सुविधा कार्यान्वित
1 min readआळेफाटा दि.२५:- ग्रामीण भागातील श्री हॉस्पिटल आळेफाटा (ता.जुन्नर) येथे वंद्यत्व व हृदय रोग निदान, फर्टिलिटी व IVF सेंटर आणि कॅथलॅब चा लोकार्पण सोहळा गुरुवार (दि.२४) रोजी भारतीय विद्यापीठ पुणे चे कुलपती शिवाजी कदम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सिताराम पाटील गायकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्ना डोके यांच्या उपस्थिती उद्घाटन संपन्न झाले. हार्ट अटॅकच्या रुग्णांसाठी आळेफाटा सारख्या मध्यवर्ती ठिकाणी अँजिओग्राफी व एन्जोप्लास्टी ची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे अंत्यव्यस्त रुग्णांचे प्राण वाचण्यास मोलाची मदत होणार असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर सदानंद राऊत यांनी केले.
जुन्नर तालुक्यात IVF टेस्ट बेबी सेंटर सुरू झाल्यामुळे स्री -पुरुष वंध्यत्व निवारण करून अधिकाधिक जोडप्यांना मातृत्वाचा आनंद घेता येणार आहे. उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या हाय टेक्नॉलॉजी च्या अत्याधुनिक मशिनरी आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना व मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून गोरगरिबी रुग्णाना दर्जेदार सेवा देण्याचा मानस यावेळी हॉस्पिटलचे डॉ. सचिन शिंदे व डॉ.मनीषा शिंदे यांनी व्यक्त केला. जुन्नर तालुक्यात या सुविधा उपलब्ध असणारे हे पहिले हॉस्पिटल आहे. या सुविधा आळेफाटा सारख्या ग्रामीण भागात उपलब्ध झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या प्रसंगी पुणे जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब खिल्लारी, जुन्नर पंचायत समितीच्या माजी सभापती संगीता वाघ, जुन्नर बाजार समितीचे संचालक धोंडीभाऊ पिंगट, डॉ. पिंकी कथे, डॉ.पंजाब कथे, जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष महादेव वाघ,जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मनोज काचळे,
लाला बँकेचे संचालक संदीप लेंडे, नळवणे गावचे ग्रामनेते बाबाजी शिंदे, प्रकाश सूर्यवंशी, उल्हास गोडसे, डॉ. श्रीरंग फडतरे व जुन्नर तालुक्यातील डॉक्टर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश गुंजाळ यांनी केले तर आभार यशवंत पतसंस्था पिंपळवंडी चे अध्यक्ष महादेव वाघ यांनी मानले.