आळेफाटा येथे नव्याने सुरू होत आहे ‘संजीवन प्यूअर व्हेज रेस्टॉरंट’ शनिवारी सायंकाळी होणार भव्य उद्घाटन सोहळा
1 min read
आळेफाटा दि.२३:- ‘संजीवन रेस्टॉरंट’ या नूतन व्यवसायाचा भव्य उद्घाटन सोहळा शनिवार दि.२६ रोजी सायंकाळी सव्वाचार वाजता संपन्न होणार आहे .तरी या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन अशोक गुंड, विश्वास गुंड, हर्षल गुंड व समस्त गुंड परिवाराने केले आहे.
या उद्घाटन सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे यांच्या शुभहस्ते हे उद्घाटन संपन्न होणार आहे.
पुणे – नाशिक हायवे, आनंद प्लाझा, श्री हॉस्पिटल समोर, आळेफाटा ता.जुन्नर, येथे हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट नव्याने सुरु होत आहे. उत्तम सेवा, स्वादिष्ट व रुचकर जेवण हे हॉटेलच मुख्य वैशिष्ट्य असून या ठिकाणी भव्य अशी पार्किंग व्यवस्था, मीटिंगसाठी एसी हॉल, बर्थडे साठी सुशोभित स्टेज तसेच सेल्फी पॉइंट अश्या सुविधा आहेत.या नूतन व्यवसायाला शुभेच्छा देण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.