चांद्रयान ३ मध्ये सहभागी असलेले जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र तरुण शास्त्रज्ञ मयुरेश शेटे यांचा राजुरी ग्रामस्थांकडून नागरी सत्कार
1 min readराजुरी दि .३०:- चंद्रयान ३ मोहिमेत मिळालेली संधी ही अभिमानास्पद बाब असल्याची माहिती इस्रोचे शास्त्रज्ञ मयुरेश शेटे यांनी दिली.यावेळी बोलताना शेटे म्हणाले राजुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व विद्या विकास मंदिर राजुरी (ता.जुन्नर जिल्हा पुणे) येथे त्यांचे शिक्षण झाले तर पुढील शिक्षण पुणे येथे केले.
या वेळी ग्रामस्थांच्या वतीने चंद्र यानातील मोहिमेत सहभागी गावचे भूमिपुत्र शास्त्रज्ञ मयुरेश शेटे यांचा नागरी सत्कार करण्यात. यावेळी माजी सभापती दिपक औटी, उपसरपंच माऊली शेळके, शरदचंद्र पतसंस्थेचे अध्यक्ष एम.डी.घंगाळे, युवा नेते वल्लभ शेळके, कैलास औटी,राजेंद्र औटी, सुरेश औटी, शिवाजी औटी, कारभारी औटी, दत्तात्रय हाडवळे,शाकीर चौगुले, रंगनाथ औटी,राजश्री रायकर, रूपाली औटी,सखाराम गाडेकर आदी उपस्थित होते.
त्यानंतर मयूर शेटे यांनी शिक्षण घेतलेल्या विद्या विकास मंदिर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ही सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी जनता विकास मंडळाचे अध्यक्ष बबन हाडवळे शाकीर चौगुले प्राचार्य जी.के. औटी पर्यवेक्षक सुनील पवार मुख्याध्यापक सयाजी हाडवळे उपस्थित होते.