साकोरीत ‘शिवजन्मभुमी’ पतसंस्थेचा रविवारी होणार भव्य उद्घाटन समारंभ

1 min read

साकोरी दि.१:- साकोरी (ता.जुन्नर) येथे ‘शिवजन्मभुमी नागरी सहकारी पतसंस्थेचा’ रविवारी दि.३ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३५ वाजता (साकोरी, ता.जुन्नर) येथे हभप तुळशीराम महाराज सरकटे यांच्या शुभहस्ते उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.

जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असून माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, माजी आमदार पोपटराव गावडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, माजी सभापती रघुनाथ लेंडे,माजी आमदार शरद सोनवणे, देवदत्त निकम (संचालक कृ.उ.बा.समिती आंबेगाव), आशाताई बुचके (सदस्या जि.प.पुणे, भाजपा नेता), माऊली खंडागळे (संचालक कृ.उ.बा.समिती जुन्नर) यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थित असणार आहे.


आशिष बबन नेहरकर संस्थेचे संस्थापक /अध्यक्ष असून विजय यशवंत साळवे (उपाध्यक्ष), प्रकाश महादेव वाळुंज (खजिनदार),विलास बापुराजे पिंगट (सचिव) आहेत. दिनकर तुकाराम वायकर,सचिन गणपत गोल्हार, संजय हौशीराम विश्वासराव, शहाजी पांडुरंग साळवे (तज्ञ संचालक), मंगेश गेनभाऊ आतकरी (तज्ञ संचालक), प्रल्हाद भानुदास साळवे, मंदा बाबाजी पानसरे, अर्जुन भगवान बनकर, प्रकाश अभिमन्यु गाडगे, मनिषा गणेश नेहरकर,

अभिषेक सुदाम पानसरे, पांडुरंग मारुती गाडगे, बजरंग केरू साळवे असे संचालक मंडळ असून संचालक मंडळाने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. गावचे माजी सरपंच व संस्थापक/अध्यक्ष विद्यानिकेतन स्कुल पांडुरंग मनाजी साळवे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे