कॅफे हाऊसमध्ये अवैधरित्या मुला-मुलींना गैरकृत्य करू देणाऱ्या कॅफे मालकाला कारावास; जुन्नर न्यायालयाने ठोठावला दंड
1 min readनारायणगाव दि.२७ :- कॅफे हाऊसमध्ये अवैधरित्या मुला-मुलींना गैरकृत्य करू देणाऱ्या कॅफे मालकाला जुन्नर न्यायालयाने तीन महिने सक्त कारावासाची शिक्षा व १० हजार रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.वारुळवाडी (ता. जुन्नर) येथील महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विशाल संदीप पवार यांच्या मालकीच्या मूनलाइट कॅफेमध्ये पडदे लावून मुला-मुलींना स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. वर्षभरापूर्वी कॅफेमध्ये महाविद्यालयातील काही मुले, मुली असभ्यवर्तन करीत असल्याच्या तक्रारीवरून रस्त्यावरील विशाल संदीप पवारच्या पोलिसांनी कॅफे मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एक वर्षा नंतर कॅफे मालकास जुन्नर न्यायालयाने गुन्ह्यामध्ये दोषी धरून दंडासह कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास आणखी १५ दिवस साधी कारावासाची शिक्षा देण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोष कोकणे करीत आहे.वारुळवाडी परिसरातील महाविद्यालयात ग्रामीण भागातून अनेक मुले, मुली शिक्षण घेण्यासाठी येत असतात. खेड्यापाड्यातून शिक्षणासाठी सकाळपासून आलेली मुले, मुली महाविद्यालयात न जाता तासन तास कॅफे हाऊसमध्ये बसून असभ्यवर्तन करीत असल्याच्या चर्चा सातत्याने होत असतात. त्यामुळे पालकांनी आपली मुले विशेषतः मुली खरोखरच शाळेत जातात की नाही? याबद्दल सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.