आळेफाटा पोलिसांणी केली १ लाख रूपयांची अवैध दारू जप्त

1 min read

आळेफाटा दि.२६:- आळेफाटा (ता. जुन्नर) पोलिसांनी १ लाख आठ हजार रुपयाची देशी- विदेशी दारू व ३ लाख ५० हजार रुपयांचा गाडी असा एकूण ४ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षण यशवंत नलावडे यांनी दिलेली माहिती अशी की, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमी दारामार्फत पोलीस हवालदार विनोद गायकवाड यांना मारूती सुझूकी या गाडीमधुन अवैध्य रित्या दारूची वाहतुक होत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीसांणी पिंपळवंडी ते भटकळवाडी या रोडवरून सापळा रचल्यानंतर मारूती सुझूकी एम.एच.१४.जे.यु.८४९८ ही येताणा गाडी दिसली असता पोलिसांणी सदर वाहन अडवुन गाडी चालक अक्षय बाबाजी लांडगे (रा.सावरगाव) यास चौकशीसाठी ताब्यात घेऊन गाडीची तपासणी केली असता. गाडीत देशी,विदेशी दारूच्या १ लाख ८ हजार ७२० रुपये किंमतीची दारू आढळुन आल्याने दारू ३ लाख ५० हजार रुपये किंमतीची गाडी असा एकुन ४ लाख ५८ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पुणे ग्रामीण चे पोलीस अधिक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे. उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र‌ चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, हनुमंत ढोबळे, सचिन रहाने, केशन कोरडे यांणी केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे