सातारा पोलिसांनी जुन्नर तालुक्यातून दोघांना केली अटक
1 min readसातारा दि.२६:- सातारा जिल्ह्यातील आसनगाव (ता.कोरेगाव) येथील शेतकऱ्याने इटलीतून आयात केलेल्या रेड रास्पबेरीची ७५ हजार रुपये किमतीची ५० रोपे चोरीला गेली होती. ही रोपे चोरणाऱ्या दोघांना वाठार स्टेशन पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथून अटक केली आहे.महेश विठ्ठल शिंदे (वय ३०, रा. नगदवाडी कांदळी, ता. जुन्नर), तुषार दत्तात्रय शिरोळे (वय २६, रा. निंबळक, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेली रोपे आणि गुन्ह्यातील कार जप्त करण्यात आली आहे.आसनगाव येथील एका शेतकऱ्याने इटलीतून भारत सरकारच्या परवानगीने रेड रास्पबेरीची पाच हजार रोपे आणून, या रोपांची तीन महिन्यांपूर्वी शेतात लागवड केली होती. त्यापैकी ५० रोपांची आरोपींनी चोरी केली होती. याबाबत वाठार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर वाठार पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथून महेश शिंदे आणि तुषार शिरोळे या दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून रोपे आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे.