बनावट पिस्तूल व कोयत्याचा धाक दाखवुन दहशत निर्माण करणारास स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिसांनी केली अटक
1 min read
नारायणगाव दि.२४:- नारायणगाव पोलीस स्टेशनचे हद्दीमधील वारुळवाडी येथील ठाकरवाडीकडे जाणाऱ्या रस्यावर दि.23 ऑगस्ट रोजी रात्रौ 11/00 वा चे सुमारास पांढर्या रंगाचे कपडे घातलेला एक इसम हा त्याचे हातातील कोयता व कमरेला पिस्तुल लावुन रस्त्यावर उभे राहुन हातवारे करून धाक दाखवुन दहशत निर्माण करत आहे. अशी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी लागलीच पोलीस स्टाफसह सरकारी वाहनाने ठाकरवाडी रोड येथील घटनास्थळी जाऊन खात्री केली.तेव्हा एक इसम कमरेला पिस्तुल लावुन हातात कोयता घेऊन हातवारे करत असताना दिसल्याने पोलीस स्टाफने त्यास शिताफिने ताब्यात घेतले.
त्याचे नाव अनिल सुनील जाधव रा. ठाकरवस्ती, वारुळवडी, ता. जुन्नर असे असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा पुढील तपास पोहवा दाते करत आहे.सदरची कारवाई मा.पो.अधीक्षक अंकित गोयल सो., अप्पर पो अधीक्षक मितेश घट्टे,उप विभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण चे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर.
सपोनी महादेव शेलार,पो. स. ई. विनोद धुर्वे, पो.ना मंगेश लोखंडे, पो.कॉ शैलेश वाघमारे, पो.कॉ.दत्ता ढेंबरे,क्राईम ब्रांच पुणे ग्रामीण चे पो हवा दीपक साबळे,पो.ना संदिप वारे, पो. कॉ. अक्षय नवले यांचे संयुक्त पथकाने केली आहे.