जुन्नर तालुक्यात घरफोडी व दुचाकी चोरणाऱ्या तिघांना नारायणगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या
1 min read
नारायणगाव दि.८:- रात्रीच्या वेळी घरफोडी, तसेच दुचाकी चोरून नेणाऱ्या तीन जणांच्या टोळीला नारायणगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चोरट्यांकडून १ लाख १० हजार किमतीच्या चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
मयूर शिवाजी सावंत (वय २० रा. कारखाना फाटा, धनगरवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे), अजय भाऊसाहेब पथवे (वय १९, सध्या रा. येडगाव, ता. जुन्नर, मूळ रा. मेनखिंड वाडी, देवठाण ता. अकोले जि. अहमदनगर), मंगेश शशिकांत काळे (वय २०, रा. अहिनवेवाडी, ता. जुन्नर जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक धुर्वे, हवालदार घोडे, लोंढे, आदिनाथ लोखंडे, मंगेश लोखंडे, सुभाष थोरात, शैलेश वाघमारे, दत्ता ढेंबरे, गंगाधर कोतकर, दरवडे, शहा, ढोबळे, पोलीस मित्र नेहरकर, गाडगे, पोलीस पाटील भुजबळ, दीपक साबळे, वारे, अक्षय नवले यांच्या पथकाने ही संशयित व्यक्ती नारायणागाव कारवाई केली.
संशयित व्यक्ती नारायणगाव व परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जगदीश पाटील, पोलीस नाईक आदिनाथ लोखंडे, सुभाष थोरात यांच्या पथकाने मयूर सावंत याला ताब्यात घेऊन चौकशी केली. सदरचा गुन्हा उघडकीस आला. सहायक पोलीस उपनिरीक्षक केंगले व पोलीस नाईक लोखंडे तपास करत आहेत.