जन्मदाती आईच ठरली वैरीण; दौंडमध्ये १८ वर्षाच्या मुलीचा गळा दाबून खून
1 min readदौंड दि.९:- जन्मदात्या आईने पोटच्या मुलीचा गळा दाबून केल्याची धक्कादायक घटना खून दौंडमध्ये (जि. पुणे) घडली आहे. या घटनेमुळे दौंड शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी सरिता हरिओम जांगिड हिने तिची मुलगी दीक्षा हरिओम जांगिड (वय १८) हिचा गळा दाबून खून केलेला आहे. ही घटना बुधवार दि.६ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबतची फिर्याद हरिओम जांगिड याने पोलिसांत दिली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दि. ६ रोजी हरिओम जांगिड हे सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास तंबाखू आणण्याकरता दुकानात गेले दुकानात गेले होते. या वेळी ते घरी परत आल्यानंतर त्यांची मुलगी विजयालक्ष्मी हिने त्यांना सांगितले की, तिची आई सरिता व बहिण दीक्षा हरिओम जांगिड यांच्या काल शाळेत झालेल्या वादावरून दीक्षाही आज कोणाशी बोलत नाही व अचानक सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दीक्षा ही रागारागाने घराबाहेर निघालेली असताना तिची आई सरिता हिने दारातून तिला आत ओढले व घरातील बेडरूममधील बेडवर बसवले. यावेळी बहीण दीक्षा हिने आईला धक्का दिला. यामुळे सरिता यांनी चिडून जाऊन दीक्षा हीस लाथाबुक्याने मारहाण केली.या वेळी घरातील विजयालक्ष्मी हिने दोघींची भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केले. परंतु दोघींचा धक्का लागल्याने विजय लक्ष्मी ही बाजूला पडली. या वेळी सरिता हिने दीक्षा हीच्या गळ्यावर लाथ मारून तिला बेडवर आडवे पाडून दोन्ही हाताने गळा दाबला तेव्हापासून दीक्षा ही गप्प पडलेली आहे, असे विजय लक्ष्मी यांनी हरिओम यांना माहिती दिली.या वेळी हरिओम जांगिड यांनी दीक्षाच्या जवळ जाऊन तिला आवाज दिला असता तिची कसलीही हालचाल होत नव्हती. तिचे अंग थंड पडले होते. त्यावेळेस दीक्षा मयत झाल्याची खात्री झाली. यामुळे सर्वजण घाबरलो घरातच बसलो. यानंतर काही वेळानंतर हरिओम यांनी दौंड पोलीस स्टेशनमध्ये येऊन पत्नी सरिता जांगिड हिच्याविरुद्ध तक्रार दिली. याप्रकरणी दौंड पोलिस पुढील तपास करत आहेत.