मारहाण व चाकूचा धाक दाखवून ४ ते ५ चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम लुटली

1 min read

राजुरी दि.१५:- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात चोरीच सत्र सुरूच असून राजुरी येथे चोरट्यांनी दोन ठिकाणी चो-या करून चार तोळयाचे दागिणे चोरून नेल्याची घटना आज शुक्रवार दि.१५ पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनकडुन मिळालेल्या माहितीनुसार राजुरी (ता.जुन्नर) येथील पाटील मळ्यातील सुनील संतु औटी व सिताराम तुकाराम औटी हे शेजारी शेजारी रहात असुन. आज पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी सुरवातीला सिताराम औटी यांच्या बंगल्याच्या दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करत घरात झोपलेल्या सर्वांणा उठवुन त्यांना सुरा दाखवत मारहाण केली व दागिने व असतील ते ‘पैसे द्या नाहीतर मारून टाकीन’ असा दम दिल्यानंतर घरात असलेल्या वृध्द महिलेच्या अंगावरील तिन तोळयाचे दागिने व दोन मोबाईल काढुन घेतले व कपाटात असलेले रक्कम घेऊन या सर्वांणा एका खोलीत नेऊन. त्यास कुलुप लावल्यानंतर या चोरटयांनी बाजुला असलेल्या सुनील औटी यांच्या घराचा दरवाजा तोडुन आत प्रवेश करुन दोन अर्धा तोळयाच्या अंगठ्या व महिलेचे महिलेचे एक तोळयाचे मंगळसुत्र व दोन हजार व मोबाईल चोरून नेले आहेत.तसेच कपाटातील सर्व साहित्य अस्तावेस्त केले.पुढील तपास आळेफाटा पोलिस करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे