मॉडर्नच्या चिमुकल्यांनी अनुभवले आहारातील फळांचे महत्व

1 min read

बेल्हे दि.२६:- मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बेल्हे (ता.जुन्नर) मध्ये मॉडर्न लिटिल चॅम्प या विभागात ‘फ्रुट्स डे’ साजरा झाला. विद्यार्थांना सर्व फळांची ओळख व त्यांचे आहारात असणारे महत्त्व समजून घेण्यासाठी हा आगळा वेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या फळांची वेशभूषा व माहिती सादर केली तर काही विद्यार्थ्यांनी घरून वेगवेगळ्या प्रकारची फळे आणून त्यांची नावे, रंग व महत्त्व सांगितले.

विद्यार्थ्यांनी फळांची केलेली वेशभूषा व सादरीकरण यांची स्पर्धा घेण्यात आली. आवळा,लिंबू, संत्री, मोसंबी, सफरचंद, डाळिंब ,सिताफळ, केळी, पपई, चिक्कू यासारखी सहज उपलब्ध होणारी फळे मानवाचे जीवन आरोग्यदायी करतात.

आपल्या आहारात विविध फळांच्या समावेशाला अनन्यसाधारण महत्त्व असून प्रत्येक विद्यार्थ्याने दररोज एका तरी फळाचे सेवन करावे असे आवाहन शाळेच्या प्राचार्या विद्या गाडगे यांनी सर्व विद्यार्थ्यांना केले.

या स्पर्धेत सिनियर केजी – प्रथम क्रमांक -फातिमा इनामदार व सुपेकर इशिता, द्वितीय क्रमांक- काव्या पिंगट व आरोही चौधरी,तर तृतीय क्रमांक देवीरा सोनवणे व बांगर कार्तिकी यांचा आला. ज्युनिअर केजी वर्गातून : प्रथम क्रमांक आहेर वीरा व नारद अधिरा, द्वितीय क्रमांक -संगमनेरकर रुद्रराज व बेलकर श्रेयांश, व तृतीय क्रमांक गुंजाळ अभिराज व पिंगट यश यांचा आला तर नर्सरी वर्गातून प्रथम वेदांती हिरवे, द्वितीय अधिरा गुंजाळ, तर तृतीय शिवण्या गगे तृतीय आला.

स्पर्धेमध्ये विजेत्या झालेल्या विद्यार्थ्यांचे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका व पालकांनी केलेले सहकार्य याबद्दल सर्वांचे अभिनंदन संस्थापक सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे, विश्वस्त दावला कणसे सर्व संचालक मंडळाने यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे