मातोश्री ग्लोबल स्कूल मध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात

1 min read

कर्जुले हर्या दि.३०:- मातोश्री ग्लोबल स्कूल कर्जुले हर्या (ता.पारनेर)मध्ये शाळेतील विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून ओवाळून त्यांना वेगवेगळ्या रंगीत राख्या बांधल्या व रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सदर प्रसंगी शाळेच्या प्राचार्या शितल आहेर यांनी रक्षाबंधन सणाचे महत्त्व व भाऊ बहिणी मधील अतूट प्रेम, सहकार्य आपल्या भारतीय संस्कृतीत किती महत्त्वाचे आहे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. ते भारतात साजरे होणारे वेगवेगळे सण व कार्यक्रम आपले कुटुंब आपला समाज समृद्ध करून बंधुभाव एकमेकांबद्दल सद्भावना वाढवतात व म्हणून समाज शांततेने सहकार्याने आपली प्रगती व विकास साधत असतो असे आहेर त्यांच्या भाषणात सांगितले.

या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या शिक्षिका संध्या निवडुंगे व राणी रासकर यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक फरीद पटेल यांनी केले तर आभार सुनील उंडे यांनी व्यक्त केले.

सदर कार्यक्रमात मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मिरा आहेर, खजिनदार बाळासाहेब उंडे, विश्वस्त डॉ. दिपक आहेर, विश्वस्त डॉ. श्वेतांबरी आहेर, संस्थेचे सेक्रेटरी डॉ.किरण आहेर, संस्थेच्या विश्वस्त व मातोश्री ग्लोबल स्कूल च्या प्राचार्या शितल आहेर, कार्यालयीन अधीक्षक यशवंत फापाळे,

शाळेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश व्यास, शाळेतील शिक्षक सुनील उंडे, सुनील रोकडे, फरिद पटेल जाफर शेख, प्रगती आहेर, सायली पिंगट, शुभांगी निमसे, सविता भांड, प्रतिमा पवार,अश्विनी केदार, किर्ती शिंदे तसेच पालक उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे