दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात पारंपरिक लोकोत्सव कार्यक्रम संपन्न

1 min read

निमगाव सावा दि.२५:-निमगाव सावा (ता. जुन्नर ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित व श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पारंपरिक लोकोत्सव कार्यक्रम संपन्न झाला.या बाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवार दि.२४ रोजी श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये नागपंचमीनिमित्त पारंपरिक लोकोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये महाविद्यालयातील सर्व प्राध्यापिका व विद्यार्थिनींनी झिम्मा,फुगडी, फेर, भोंडला, पारंपरिक वेशभूषा, संगीत खुर्ची पारंपरिक खेळ लोकगीते व त्यावर गीत गायन व नृत्य सादर करून सर्व महिलांनी हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पाडला.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या संस्थेच्या संस्था संस्था प्रतिनिधी कविता संदिपान पवार या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व पुरुष कर्मचाऱ्यांनी देखील या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग दर्शविला.
महाविद्यालयातील सर्व प्राध्यापिका व विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाचा मनसोक्त व मनमुराद आनंद लुटला. त्यामध्ये झिम्मा खेळताना सर्वांनी अतिशय मनमुरादपणे झिम्मा खेळला. फेर धरून लोकगीते सादर केली, सर्वांनी मनमुरादपणे फुगडी चा आनंद घेतला पूर्ण मैदान रंगीबेरंगी होऊन गेले होते. पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्वांनी नवनवीन कल्पना आपल्या वेशभूषातून साकार केल्या. संगीत खुर्चीचा आनंद घेताना गाण्याच्या तालावर सर्वांनी रस्सी ओढ व रस्सीखेच पद्धतीने संगीत खुर्चीचा आनंद घेतला.पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयातील जुनिअर कॉलेजचे सर्व विद्यार्थी देखील यामध्ये सहभागी झाले होते. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर छाया जाधव मॅडम यांनी या कार्यक्रमा योजनांमध्ये मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील सर्व प्राध्यापिकांनी हा कार्यक्रम आयोजित केला. यामध्ये प्रा.गायकवाड ज्योती, प्रा. आहेर नंदा, प्रा. उनवणे मंगल, प्रा. कांबळे शितल, प्रा. पाटे पूनम, प्रा. डुकरे प्रियंका. प्रा. चिंचवडे पूजा, प्रा. भोर माधुरी, प्रा. काळे अश्विनी, शेरकर सरिता, थिगळे पूजा, उनवणे कमल. आदी सर्व महिला कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. महाविद्यालयाचे संस्थापक पांडुरंग पवार, अध्यक्ष संदिपान पवार , सचिव परेश घोडे यांनी देखील या वेळेस या कार्यक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे