समर्थ संकुलात वसुंधरा फाऊंडेशन च्या माध्यमातून २५० विविध झाडांचे वृक्षारोपण व वृक्ष वाटप

1 min read

बेल्हे दि.२२:- समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (ता.जुन्नर) येथे वसुंधरा फाऊंडेशन, पुणे आणि राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके आदि मान्यवर उपस्थित होते. वसुंधरा फाउंडेशन हे पर्यावरण,आरोग्य,शैक्षणिक,सांस्कृतिक,साहित्यिक,वैचारिक आणि संस्कृती संवर्धन इत्यादी क्षेत्रात सामाजिक योगदान देत आहे.स्मार्ट बालक-पालक कार्यशाळा,व्हील चेअर वाटप,मी शून्य संगीत कार्यक्रम,पादुका दर्शन सोहळा व भंडारा.शब्दसुरांच्या काठावर,सह्याद्री वनराई फाउंडेशन भेट,प्रशासकीय सेवा पुस्तक वाटप व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन केले जाते. वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष धनंजय भोसले, अभिजीत पाठक,आप्पासाहेब घोरपडे,समीर मरकळे,गुलाब घुले, सुरेश काळे,विनोद मुंगारे,हेमंत जोशी,वैभव ताठे,आप्पा बोरकर व इतर सहकारी आदि मान्यवरांच्या हस्ते समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये २५० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.भारतीय वंशावळीची फुलझाडे,फळंझाडे लावणे आणि त्याचे संवर्धन करणे या हेतूने आपण हा कार्यक्रम करत असल्याचे अध्यक्ष धनंजय भोसले यांनी सांगितले. त्यामध्ये आयुर्वेदिक, शोभेच्या फुलांची, फळांची झाडे, देशी वृक्ष, वड, पिंपळ, कडुलिंब, जांभूळ, उंबर, पळस, चिंच इत्यादी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.वृक्षसंवर्धन,पर्यावरणाचे रक्षण व संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक असल्याचे यावेळी संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके म्हणाले.या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळातील इंजिनिअरिंग,बी सी एस व फार्मसी या विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.सदर कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा.दिनेश जाधव,विद्यार्थी विकास मंडळ समन्वयक प्रा.अमोल भोर,प्रा. सचिन भालेकर,प्रा.गणेश बोरचटे,सचिन दिवेकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे