मॉडर्न इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांनी केला ‘पिंक डे’ साजरा

1 min read

बेल्हे दि.२० :- बेल्हे (ता.जुन्नर) येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या शाळेच्या बालचमुंचा ‘पिंक डे’ साजरा झाला. यावेळी शाळेच्या पुर्व प्राथमिक विभागातील सर्व मुलांनी गुलाबी कपडे व सर्व गुलाबी रंगाचे साहित्य वापरून ‘पिंक डे’ उत्साहात साजरा केला. जांच्याकडे जास्तीत जास्त पिंक वस्तू, कपडे आहेत त्यांच्यात स्पर्धा घेण्यात आली होतो.सिनियर केजी मधून प्रथम सुमय्या भंडारी, द्वितीय जिनेशा गुगळे, तृतीय हृथ्वी गांधी, ज्युनियर केजी मधून प्रथम अभिराज गुंजाळ, द्वितीय अन्वय कडुसकर व वेदश्री कडुसकर, तृतीय अन्वित मोकाशी व आराध्या नवले तर नर्सरी क्लास मधून प्रथम आराध्या गुंजाळ, द्वितीय अर्श म्हस्के, तर तृतीय आराध्या बांगर चा आला.संस्थचे संस्थापक सीए सावकार गुंजाळ,अध्यक्ष गोपीनाथ शिंदे,सीईओ शैलेश ढवळे,सर्व संचालक मंडळाने सर्व विजेत्या विद्यार्थांचे अभिनंदन केले.यावेळी प्राचार्या विदया गाडगे यांनी गुलाबी रंगाचे महत्व विशद केले.

गुलाबी रंगाबरोबर सर्वच रंग आपल्या जीवनात कसे फायदेशीर असतात ते सांगितले तसेच जीवनातील गुलाबी रंगाचे असणारे अनन्यसाधारण महत्व मुलांना सांगितले. मुलांनी विविध गुलाबी रंगाच्या वस्तु बनविल्या होत्या. काही विद्यार्थांनी तर पिंक भाज्या देखील आणल्या होत्या.यावेळी प्राचार्या विदया गाडगे, संस्थेचे विश्वस्त दावला कणसे, प्रिप्रायमरी विभागाच्या सर्व शिक्षिका यांनीही सहभाग घेउन ‘पिंक डे’ यशस्वी साजरा केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे