आळेफाटा येथे उद्या आमदार खासदार यांच्या उपस्थितीत भव्य रस्तारोको आंदोलन; हजारोंच्या संख्येने उपस्थिती रहा:- आमदार अतुल बेनके

1 min read

आळेफाटा दि.२१:- केंद्र सरकारने कांदा निर्णयातीवर ४० % शुल्क लागू केल्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने आळेफाटा (ता.जुन्नर) येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करणार आहे. उद्या मंगळवार दि. 22 रोजी सकाळी नऊ वाजता आळेफाटा चौकामध्ये हे आंदोलन असणार आहे. या आंदोलनामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके,तालुक्यातील शेतकरी संघटना, जुन्नर तालुका शिवसेनाप्रमुख माऊली खंडागळे, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार. शरद लेंडे, माजी आमदार बाळासाहेब दांगट, शाम माळी,प्रसन्नअण्णा डोके यांसह अनेक नेते व शेतकरी उपस्थित असणार आहेत. या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन आमदार अतुल बेनके तसेच खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे