गुंजाळवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

1 min read

गुंजाळवाडी दि.२१:- गुंजाळवाडी (ता.जुन्नर) येथील एकनाथ बोरचटे यांच्या जनावरांच्या गोठ्यावर रविवारी (दि.२०) रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून शेळीचा फरशा पडला. संजय नरळे वनरक्षक बेल्हे बीट आणि जे.टी भंडलकर वनकर्मचारी यांना बबन गुंजाळ यांनी दुरध्वनी द्वारे सबंधित हल्याची माहीती दिली. तत्काळ संबंधीत अधिकारी यांनी दखल घेतली व पंचनामा केला. दिड वर्षाची गाभण शेळी होती. पंचनामा प्रसंगी बबन गुंजाळ, मारुती बोरचटे व लक्ष्मण बोरचटे उपस्थित होते. वनअधिकारी यांनी तत्काळ पंचनामा करून शासकीय मदतीचे अश्वासन दिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे