अन्यथा तालुक्यात एक ही एसटी बस चालू देणार नाही
1 min readबोरी दि.२२:- परेल आगाराने परेल -बोरी एसटी बंद केल्याने प्रवासी व ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.तसेच ही एसटी पुर्ववत सुरू करण्यात यावी, अन्यथा जुन्नर तालुक्यात परेल आगाराची एकही एसटी येऊ दिली जाणार नसल्याचे बोरी गावचे सामाजिक कार्यकर्ते सुनिल जाधव, पांडुरंग जाधव, राजेंद्र भोर यांनी सांगितले.जुन्नर तालुक्यातील बोरी या ग्रामीण भागात परेल आगाराची परेल-बोरी एसटी माळशेज मार्गाने सुरू होती. माळशेज मार्गे येणारी पहिली एसटी बस होती. ३५ वर्षांपूर्वी सुरू झालेली एसटी ही काही महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे. एसटी बस सुरु केल्यावर प्रवाशांचा प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली की, संबंधित अधिकारी लगेच एसटी बस बंद करतात. यावर अनेक वेळा ग्रामस्थांच्या मागणी नुसार ८ दिवस, महिनाभर चालू करायची की, पुन्हा बंद करायची. असा लपंडाव संबंधित आगाराच्या अधिका-यांनी चालविला आहे. सध्या जुन्नर तालुका व आसपासच्या इतर तालुक्यातील काही गावांमध्ये चालक – वाहकांंच्या मर्जीनुसार एसटी बस चालवल्या जात आहे. आगारामधील अधिकारी ही चालक-वाहक देतील त्या माहितीनुसार अधिकारी स्वतः कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता एसटी बंद करतात. परेल- बोरी ही एसटी प्रवाशांचा जीव का प्राण होती.या एसटीशी बोरी आणि पंचक्रोशीतील प्रवाशांची नाळ जोडली गेलेली होती. सदर ही एसटी बंद करून परेल आगाराने या नंतर जुन्नर व शेजारच्या इतर तालुक्यातील गावांत एसटी बस सुरू ठेवल्या आहेत. ज्या आज ही तोट्यात चालू आहेत. मग या एसटी बस तोट्यात असतानाही कशा चालविल्या जातात मग या मध्ये वाहक-चालकांचा किंवा अधिका-यांचा स्वार्थ आहे का असा सवाल उपस्थित करून संशोधनाचा विषय ठरत आहे. या बाबत लवकरच परेल आगाराकडे माहिती अधिकार अंतर्गत अर्ज करून एसटीच्या कारभाराबाबत माहिती मागवली जाणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भोर यांनी सांगितले.