मूलभूत विज्ञानात तुलनेने करिअरच्या अधिक संधी:- वरिष्ठ शास्त्रज्ञ मिलिंद औटी
1 min readआळे दि १९-: बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आळे (ता.जुन्नर) मध्ये नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत व विज्ञान मंडळाचे उद्घाटन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी रुपेश गुंजाळ व मिलिंद औटी यांचे शुभहस्ते संपन्न झाले. मूलभूत विज्ञानामध्ये आजही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांपेक्षा मूलभूत विज्ञानामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी तुलनेने खूप कमी खर्च येतो असे प्रतिपादन बाळासाहेब जाधव महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व ग्लेनमार्क फार्मा कंपनीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ मिलिंद औटी यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी एशियन वर्ल्ड वाईड सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड चे जनरल मॅनेजर रुपेश गुंजाळ यांनी आपल्या मनोगतामध्ये उत्तम करिअरसाठी शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती जोपासण्याची गरज असल्याची नमूद केले. सध्याच्या काळात करिअरच्या मागे लागून तरुण पिढीचे आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्याने कुटुंब व्यवस्था धोक्यात येत आहे.
यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांची योग्य ती काळजी घेणे व कुटुंबामध्ये सुसंवाद राखणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. प्रमुख अतिथी लाभलेल्या दोन्हीही माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या करिअरमध्ये बाळासाहेब जाधव महाविद्यालयातील शिक्षक व ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे खूप मोठे योगदान असल्याचे आपल्या मनोगतात आवर्जून नमूद केले.
महाविद्यालय विकास कमिटीचे अध्यक्ष प्रदीप गुंजाळ यांनी माजी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या शैक्षणिक जडणघडणीमध्ये मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे याप्रसंगी नमूद केले. प्राचार्य डॉ.प्रवीण जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता व सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून महाविद्यालय नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन करीत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष अजय कुऱ्हाडे, सचिव अर्जुन पाडेकर, उपाध्यक्ष सौरभ डोके, संस्थेचे खजिनदार अरुण हुलवळे, संस्थेचे संचालक बाळासाहेब जाधव, किशोर कुऱ्हाडे, बबन सहाणे, भाऊ कुऱ्हाडे, उल्हास सहाने, शिवाजी गुंजाळ , बाबु कुऱ्हाडे, जीवन शिंदे, दिनेश सहाणे, सम्राट कुऱ्हाडे, देविदास पाडेकर, कैलास शेळके, रमेश कुऱ्हाडे आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन सायन्स फॅकल्टी इनचार्ज डॉ.अरुण गुळवे, डॉ.रमेश भिसे, डॉ जयसिंग गाडेकर, डॉ. राधाकिसन तागड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायन्स असोसिएशनचे चेअरमन, प्रा विकास पुंडे व आभार प्रदर्शन, डॉ. आर. सी. भुजबळ यांनी केले.