आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय; गौरी-गणपती ही मिळणार आनंदाचा शिधा; रस्ते जोडण्यासाठी ५ हजार कोटीचा प्रस्ताव
1 min readमुंबई दि.१८:- आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. गौरी-गणपती उत्सावासह दिवाळीत नागरिकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा ‘ दिला जाणार आहे. त्यानुसार या शिधापत्रिका धारकांना १०० रुपयांत एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल देण्यात येणार आहे. याशिवाय आजच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आला आहे.
हे निर्णय घेण्यात आले.
१) आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात भरीव वाढ . आता दरमहा ५०० रुपये मिळणार २) मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी
३) महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द ४)केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम. राज्याचा हिस्सा वाढला.५)सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे६) राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार. भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार. ५ हजार कोटीचा प्रस्ताव, ७) गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचाशिधा. प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा शिधाया राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.