कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू; निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली

1 min read

सातारा दि.१०:- विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर फुलांचा सडा बहरण्यास सुरुवात झाली असून कासवर खरी रंगाची उधळण पाहायला मिळणार आहे. पठारावर फुलांचा हंगाम अगदी तोंडावर असून कास पठार कार्यकारी समिती मार्फत पर्यटकांना सुलभ पर्यटन होण्यासाठी विविध सुविधा पुरविण्याबाबत तयारी सुरू आहे.

पठारावरील फुले पाहण्यासाठी मात्र गतवर्षी पासून  दीडशे रुपये मोजावे लागणार आहेत. पठारावर पावसाच्या उघड-झापमुळे पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. कास पठार कार्यकारी समितीने तातडीने हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रत्यक्षात १० सप्टेंबरनंतर कास पठाराचे ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या पर्यटकांना ऑनलाइनची सुविधा https://www.kas.ind.in या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क १५० रुपये, गाईड फी ४५ मिनिटाकरता शंभर रुपये, उपद्रव शुल्क दोन हजार रुपये,

बारा वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश व शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ४० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. शालेय मुलांसाठी सोमवार ते शुक्रवार या दिवशी येणे बंधनकारक असणार आहे. यासाठी महाविद्यालय प्राचार्यांचे पत्र सक्तीचे करण्यात आले आहे.

सध्या पठारावर चवर (रानहळद), पांढऱ्या रंगाची पंद, पाचगणी आमरी ही फुले बहरत असून पांढरे चेंडूच्या आकाराचे गेंद फुल ही दिसू लागले आहे.पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.तरीही पावसाचे प्रमाण कमी होवून उन्हाची ताप पडली तरच विविधरंगी फुलांचा बहर येण्यास सुरुवात होणार आहे.

यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता सध्यातरी दिसत आहे. कास पठार कार्यकारी समिती मार्फत सद्यस्थितीत पठारावर असणारे मंडप गुहा, बदारतळ, कास तलाव व्ह्यू पॉइंट या तीन पॉइंटला पर्यटकांना पन्नास रुपये शुल्क आकारून प्रवेश दिला जात आहे.

कास पठारावर फुलांची संख्या कमी झाल्याने विविध पर्यावरण वादी व अभ्यासक यांच्या अभिप्रायानुसार, पठाराला असणारी लोखंडी जाळी यावर्षी उन्हाळ्यात काढण्यात आली.

पण, पर्यटक फुलांच्या क्षेत्रात कसेही प्रवेश करत असल्याने गतवर्षी पठारावर समितीच्या वतीने फुलांच्या भागाचे संरक्षण करण्यासाठी तात्पुरती तंगुसाची जाळी बसवण्यात आली होती. कास परिसरात सध्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत असून दाट धुके,

रिमझीम पाऊस व अंगाला झोंबणारा गार वारा असं मस्त वातावरण आहे. विकेंड व पंधरा ऑगस्टमुळे पर्यटकांची चांगलीच रेलचेल पावसाचा आनंद लुटताना दिसत आहेत. असून पर्यटक

धबधब्यांवर पर्यटनाला बहर..

कास परिसरातील भारतातील सर्वात उंच धबधबा असलेल्या वजराई धबधबा व एकीवचा धबधबा या दोन धबधब्यांवर सध्या पर्यटकांची चांगलीच गर्दी होत असून पावसाचे प्रमाण चांगले राहिल्यास धबधब्यांचा सिजन वाढू शकतो.

कास पठारावर कसे जावे?

NH ४ वर, कास पठार हे टॅक्सी आणि सार्वजनिक वाहतुकीच्या जवळ आहे. सातारा ते कास असा २२ किमी प्रवास करणाऱ्या काही राज्य बसेससह सार्वजनिक वाहतुकीने किंवा टॅक्सी भाड्याने घेऊन पठारावर पोहोचता येते. जर तुम्ही तुमची स्वतःची कार चालवत असाल तर तुम्हाला मुख्य वाहत्या भागाच्या पलीकडे थोडेसे पार्क करावे लागेल आणि सुमारे एक किलोमीटर चालावे लागेल.

हवाई: पुणे, जे साताऱ्यापासून १२७ मैलांवर आहे आणि चांगल्या रस्त्यांची सोय आहे, सर्वात जवळचे विमानतळ आहे. टॅक्सीने कास पठारावर सहज जाता येते किंवा साताऱ्याला बसने जाता येते, त्यानंतर साताऱ्याहून कास पठारावर टॅक्सी जाते.

रेल्वे: कास पठारापासून २२ किलोमीटर अंतरावर असलेले सातारा हे सर्वात जवळचे रेल्वेमार्ग आहे. कॅब भाड्याने घेतल्यास या पठारावर जाणे सोपे होईल. टीप:- सर्व फोटो संग्रहित आहेत

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे