सह्याद्री व्हॅलीत चेअरमन व्ही.आर दिवाकरण यांच्या हस्ते ध्वजारोहण
1 min read
राजुरी दि.१५:- सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूल राजुरी (ता.जुन्नर) येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला. चेअरमन व्ही.आर दिवाकरण यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून नासाचे मिस श्रेया माने (नासा सादृश्य अंतराळवीर आणि रॉकेट वैज्ञानिक), प्रवीण वाकोडे (पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ), योगीराज लोंबळे (पुरस्कार विजेते शिक्षणतज्ञ), योगेश उंडे (पुरस्कार विजेते शिक्षणतज्ञ) त्यांनी विज्ञान व तंत्रज्ञानाविषयी अनमोल मार्गदर्शन केले.
सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूल व चेअरमन व्ही.आर. दिवाकरन,ट्रस्टी डॉ.भानूशाली, सचिन चव्हाण, किशोर पटेल, गणपत कोरडे व नलिनी कोरडे, ॲड. शंकर महाराज शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, गायन ,नृत्य ,भाषण अशा अनेक कला सादर करून उपस्थितांचे मने जिंकून घेतली. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.अशी माहिती शाळेच्या प्राचार्य रिजवाना शेख यांनी दिली.